fbpx

गोडखेड येथे चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पतीची हत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । जामनेर तालुक्यातील गोडखेल  येथे पती हा पत्नी वर नेहमी चारित्र्या वर संशय घेत असल्याच्या कारणावरून दिनांक 6 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी पत्नीने पतीचा दोरीच्या साह्याने हत्या केल्याची घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

तालुक्यातून गोदखेड येथील मयत दिलीप विश्वनाथ सोनवणे व त्यांच्या पत्नी आरोपी संगीता दिलीप सोनवणे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला व त्यांना दोघांना दोन लहान मुला हे दोघे एकत्र जात असताना मयत दिलीप सोनवणे पत्नीवर संशय देण्याच्या कारणावरून नेहमी भांडण व्हायचे. या भांडणाचा उद्रेक झाला असून दिनांक 6 रोजी रात्रीच्या वेळी दोघांमध्ये मुलासमोर भांडण झाले. ते पती दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेत असल्याकारणामुळे घरात झोपेत आरोपी पत्नी संगीता सोनवणे यांनी मुलासमोर पती दिलीप सोनवणे यांच्या घरामध्ये गळ्याला दोरी लावून गळफास देऊन हत्या केली.  सर्व घटना लहान मुला समोर झाली असून पाच वर्षाच्या मुलाने आखो देखी हाल पोलिसांना सांगितले,

याबाबत आरोपीने गुन्हा कबूल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत मयताची बहीण कल्पना युवराज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज