fbpx

घराला लागलेल्या भीषण आगीत पती पत्नीचा होरपळून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । घराला लागलेल्या भीषण आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू हृदयदायक घटना मध्यरात्री जामनेर तालुक्यातील गारखेडा बुद्रुक येथे घडलीय. या दुर्घटनेमुळे  परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत असे की, गारखेडा बु. येथील उत्तम श्रावण चौधरी (वय ४५) व त्यांच्या पत्नी वैशाली उत्तम(वय ४०) हे घरात झोपलेले असताना काल दिनांक १० च्या मध्यरात्री त्यांच्या घरात भीषण आग लागली. भुसावळ जामनेर रस्त्यावरुन जात असलेल्या ट्रकचालकास घरातून धूर निघताना दिसल्यानंतर त्या ट्रक चालकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.

mi advt

त्यानंतर, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने घरात प्रवेश करण्यास त्यांना त्रास झाला. अखेर, स्थानिकांच्या मदतीने ग्रामस्थांनी घराचा दरवाजा तोडला असता, समोरील वेदनादायी चित्र पाहून सर्वांचेच मन हेलावले. या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, चौधरी यांना विवाहीत मुलगी व एक मुलगा आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज