शेतीच्या वादातून पती-पत्नीस बेदम मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । रताळे ( ता. पारोळा ) येथे शेतीच्या वादातून पती-पत्नी दोघांना मारहाण झाल्याची घटना १ रोजी सकाळी १० वाजता घडली. मच्छिंद्र बापू पवार, ज्ञानेश्वर पवार, भुरा पवार व आबा पवार असे संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील रताळे येथील शोभाबाई वाघ या शेतातून जात असताना संशयित मच्छिंद्र बापू पवार, ज्ञानेश्वर पवार, भुरा पवार व आबा पवार यांनी शेतातील रस्त्यावरून का जाते असे म्हणत पूर्व वैमनस्यातून शोभाबाईंसह त्यांचे पती सुदाम वाघ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १ रोजी सकाळी १० वाजता घडली.  तसेच संशयितांनी विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी दांपत्यांनी दिलेल्या फिऱ्यावरून पारोळा पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे,

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -