शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश 

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. अनिकेत पाटील, प्रविण चव्हाण, आश्विन कोळी, विनायक धाडे, योगेश राठोड, पंकज चौहान, विजय इंगळे, अंकुश चौहान यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी तालुका प्रमुख छोटु भोई, उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, अविनाश वाढे, जोंधनखेडा सरपंच कुरबान तडवी, धामणगाव शाखा प्रमुख जावेद खान, शेख अकबर, शेख फारुख, सिध्दार्थ पाटोळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रवेशितांच्या गळ्यात भगवा रुमाल टाकुन त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज