जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे? वाचा! स्वाधार योजना ही जे विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकामध्ये मोडतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्कॉलरशिप ही देण्यात येत असते.
या स्वाधार योजनेमध्ये लाभ मिळविण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना जेवण, राहण्याची सोय व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत म्हणून या स्वाधार योजने अंतर्गत अशा विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात काही रक्कम वितरित करण्यात येत असते.
‘या’ योजनेअंतर्गत स्कॉलरशिप किती मिळते?
जे विद्यार्थी मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकतात. अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 32,000 रुपये तसेच निवास भत्ता हा 20,000, निर्वाह भत्ता 8000 रुपये असे मिळून एकूण वार्षिक अनुदान हे 60,000 रुपये देण्यात येते.
शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती भत्ता मिळतो?
भोजन भत्ता हा 28,000
निवास भत्ता हा 15,000
निर्वाह भत्ता हा 8,000
असे मिळून वार्षिक अनुदान 51,000 मिळते.
मनपा शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती भत्ता मिळतो?
भोजन भत्ता हा 25,000
निवास भत्ता हा 12,000
निर्वाह भत्ता हा 6,000
असे मिळून एकूण वार्षिक अनुदान हे 43,000 मिळते.
स्वाधार योजनेसाठी पात्रता काय आहे?
अर्ज करणारा विद्यार्थी हा सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारा विध्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द या घटकातील असावा.
स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला शासकीय किंवा समाजकल्याण वसतिगृहात प्रवेश न घेतलेला विद्यार्थी असणे