fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाकडून घरातील वस्तूंची तोडफोड

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । शहरातील राधाकृष्ण नगरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या वडिलांनी दारूसाठी पैसे न दिल्याने घरातील टीव्ही, शोकेस आणि इतर वस्तूंची तोडफोड केल्याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राधाकृष्ण नगरात भास्कर दत्तात्रय गायकवाड वय-६४ हे  परिवारासह राहतात. दि.८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा मुकेश भास्कर गायकवाड याने दारू पिण्यास पैसे मागितले. ते देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणाने घरातील टीव्ही, लाकडी कपाट, भांडी फोडून नुकसान केले तसेच तुम्हाला पाहून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज