उपक्रमशील शिक्षक ईश्वर महाजन यांचा सन्मान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । प्राथमिक व माध्यमिक विभाग जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत माझी शाळा, माझा उपक्रम यात शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल जळगांव जिल्हापरिषद सभागृहात शिक्षणसभापती रवींद्र पाटील, माजी शिक्षणसभापती पोपटतात्या भोळे,जि.प.सदस्य रवींद्र पाटील, सौ प्रमिला पाटील व शिक्षणविभागाचे देवांग,अकलाडेसाहेब, विजय पवारसाहेब यांच्या हस्ते महात्मा फुले हायस्कूल देवगांव येथील उपक्रमशील शिक्षक ईश्वर महाजन यांना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.

त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, जनक्रांती पक्षाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर,जेष्ठ पत्रकार गोपी लांडगे,मानवाधिकार संघटनेचे प्रदेश सचिव शिवचरण उज्जैनकर,माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरूड ,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,ठोस प्रहार च्या संपादीका प्रा. जयश्री साळुंखे, सह शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व अभिनंदन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -