खाटीक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव तालुका मुस्लिम खाटीक समाजतर्फे खान्देश बाजार मंगल कार्यालय येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात खाटीक मुंनाझा यांनी पवित्र कुराण पठणाने केली. त्यानंतर यूसरा खाटीक या विद्यार्थिनीने नात सादर केली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहसीन मुनाफ खाटीक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक वर्धमान धाडीवाल, हाजी हुस्नोद्दीन, हाजी इब्राहिम, प्रोग्रेसिव एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन शकील खाटीक, एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा चेअरमन युनुस खाटीक, मोहसीन खाटीक, झाकीर खाटीक, सलीम हाजी, अब्बास खाटीक, अनवर खाटीक, सलीम खाटीक, युनुस खाटीक, शब्बीर सेठ, हाजी गफूर पहेलवान, इक्बाल कुरेशी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर धुळे येथील ज्येष्ठ नेते हाजी हुस्नोददिन, हाजी इब्राहिम, हाजी शकील, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन शकील शेख यांना ‘लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’ने, अनवर खाटीक (फैजपूर) व अब्बास खाटीक (मालेगाव) यांना ‘एक्ससिलेंट यग सोशल वर्कर’ तर अफसर खाटीक यांना ‘बेस्ट टीचर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रोग्रेसिव एज्युकेशन फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष अफसर खाटीक यांनी तर सूत्रसंचालन कैसर खाटीक यांनी केले. यशस्वीतेसाठी शकील हाजी, फकीर मोहम्मद शेख, वाहिद खाटीक, कैसर खाटीक, भिकन खाटीक, पप्पू शेठ, अमर हाजी, नेहाल खाटीक, जाकीर शेख, शकील शेख, अखलाक खाटीक, रमजान खाटीक, शकील सरदार, सगीर खाटीक, अफसर खाटीक आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज