कुटुंबनायक रमेश पाटील यांचा गाैरव, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । लेवापाटील समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांना पंचाहत्तरीनिमित्त आयोजित समारंभात मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावल तालुक्यातील पाडळसे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे होते ते प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या. कार्यक्रमात सन २०१८ मध्ये झालेल्या चौथ्या महाअधिवेशनाचा अहवाल विष्णू भंगाळे यांनी सादर केला. यावेळी सकल लेवा समाजाचा कुटुंब नोंदणी अभियानाचे उद्घाटन रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, लेवापंचायत युवा अध्यक्ष ललीत पाटील, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, सभापती पल्लवी चौधरी, माजी आमदार दिलीप भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, भोरगाव लेवा पंचायत भुसावळचे अध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, डॉ.बाळू पाटील, सुहास चौधरी, आरती चौधरी, मंगला पाटील, जयश्री चौधरी, शरद फेगडे, आर.जी.चौधरी, डिगंबर महाजन, मनोज जावळे आदी उपस्थित होते.

अमृतमहोत्सवी समितीचे सदस्य ललीत पाटील, प्रभात चौधरी, गिरीश नारखेडे, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, ललीत चौधरी, डाॅ. प्रियदर्शिनी सरोदे, गीता चौधरी, डॉ. उदय चौधरी, भरत महाजन, जितेंद्र फिरके, दिनेश भंगाळे, संजय पाटील, चेतना पाटील, राजेश वारके यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर रमेश पाटील यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रभात चौधरी यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज