fbpx

होमगार्डचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर सापडलेला मोबाईल केला परत!

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । आजकालच्या काळात कुणी रस्त्यावर सापडलेला रुपया देखील परत करत नसताना शहर पोलीस ठाण्यातील एका होमगार्डने रस्त्यावर सापडलेला २० हजारांचा मोबाईल परत केला आहे.

शाहूनगरातील रहिवासी असलेले योगेश रमेश वाणी हे सायंकाळच्या सुमारास रस्त्याने जात असताना खिशातून त्यांचा मोबाईल रस्त्यावर पडला. काही वेळानंतर त्यांनी शोध घेतला असता मोबाईल मिळून आला नाही. शहर पोलीस ठाणे अंतर्गत बंदोबस्ताला असलेले होमगार्ड कर्मचारी अस्लम पिंजारी हे त्या रस्त्याने येत असताना त्यांना रस्त्यावर एक मोबाईल पडलेला दिसला. पिंजारी यांनी मोबाईल खिशात ठेऊन पोलीस ठाण्यात आणला. काही वेळाने त्या मोबाईलवर वाणी यांनी फोन केल्यावर त्यांनी याबाबत माहिती दिली.

mi advt

मोबाईल योगेश वाणी यांच्या मालकीचा असल्याची खात्री पटल्यावर पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आला. २० हजारांचा मोबाईल परत मिळाल्याने वाणी यांनी होमगार्ड अस्लम पिंजारी यांचे आभार मानले. पिंजारी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज