fbpx

एरंडोल येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । एरंडोल येथे रामचंद्र नगरातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सेवानिवृत्त कर्मचारी अब्दुल बशीर पिंजारी हे घराला कुलूप लावून जवळपास पंधरा दिवसापासून मुलाकडे मुंबईला गेले असता. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घराच्या पुढच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. व यावेळी आतील कपाट तोडून दागिने व पैसे चोरण्याचा प्रकार झाला.

या प्रयत्नात अज्ञात चोरट्यांनी कपाटातील कपडे व इतर सामान तसेच घरातील इतर सामान इतस्ततः फेकला घर मालक गावाला असल्यामुळे किती ऐवज लंपास झाला हे समजू शकले नाही घर मालक पिंजारी हे घरी परतल्यावर नेमकी चोरी किती व कशाची झाली हे उघडकीस येईल दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन सदर चोरीच्या घटनेची पाहणी केली.

रविवारी सकाळी अब्दुल पिंजारी यांच्या घरासमोर राहत असलेले त्यांच्या भावाला दरवाजा अर्धवट उघडा दिसला असता भाऊ रात्री मुंबईहून परत आले असावेत असे त्यांना वाटले परंतु दुपारपर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

याबाबत रात्री उशिरापर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनला काही एक नोंद नव्हती.  चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी जोर धरत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज