चाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवाब मलीक यांच्या पुतळ्याची होळी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । हसीना पारकर सोबत नवाब मलिकचे संबंध,अंडरवर्डची जमीन यांनी कवडीमोल भावाने खरेदी केली, करोडो रुपयांची जमीन अवघ्या 20 लाखात विकत घेतली. त्यावेळी ते मंत्री होते व आपल्या मंत्रीपदाचा एकप्रकारे स्वार्थासाठी एकप्रकारे गैरफायदा मालिकांनी घेतल्याचे दिसून येते. तसेच माफिया,दशहतवादी, राष्ट्र विरोधी शक्तींशी संबंध असल्याचे सिद्ध होते म्हणून, नवाब मलिकने मंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत चाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने मालिकांच्या पुतळ्याची होळी केली. दरम्यान, नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यांची उपस्थिती होती 

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.के बी दादा साळुंखे,तालुकाध्यक्ष प्रा सुनील निकम सर,शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटीलविधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे,प स गटनेते संजुतात्या पाटील,युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील,युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे,नगरसेवक चंद्रकांत तायडे,नगरसेवक सोमसिंगआबा पाटील,शहर सरचिटणीस जितू वाघ,शहर सरचिटणीस अमोल नांनकर,सरचिटणीस गिरीश बरहाटे,डॉ महेंद्रसिंग राठोड,कैलासभाऊ पाटील,राहुल पाटील,कैलास गुजर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज