हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचा १२ रोजी सत्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१। सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) जळगाव जिल्हाच्यावतीने रविवार दि.१२ रोजी जळगाव शहरातील आदित्य लॉन्स येथे सरपंच मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात आदर्श ग्राम योजना कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जि.एम. फाउंडेशनच्या कार्यालयात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे जिल्हा समन्वयक बाळू धुमाळ, श्रीकांत पाटील, बाळू चव्हाण आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. पाटील म्हणाले की, पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गिरीश महाजन हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ.राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.चंदुलाल पटेल, आ.संजय सावकारे, आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील, आ.किशोर पाटील, आ.अनिल पाटील, आ.लता सोनवणे, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे आदी उपस्थित राहणार आहेत.

उपस्थितीचे आवाहन
जिल्ह्यातील सरपंच यांचे संघटन व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -