fbpx

हिंदू नववर्ष, रमजान मासारंभ नकारात्मकतेची मरगळ दूर करेल : महापौर जयश्री महाजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । कोरोनाने गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाच्या मनात भीतीचे घर निर्माण केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वत्र नकारात्मकता भरली गेली आहे. अनेकांनी आपले जीवलग गमावले तर अनेक जण गंभीर परिस्थितीला तोंड देत बरे झाले. 

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असून मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला देखील सुरुवात होत आहे. कोरोना काळात सर्वधर्मीय जात, धर्म, पंथ विसरून एकमेकांची मदत करीत आहे. हिंदू नववर्ष आणि रमजान मासारंभापासून प्रत्येकाने स्वतःमध्ये सकारात्मकतेचा स्रोत जागरूक करून नकारात्मक ऊर्जा दूर सारण्याचा संकल्प करावा. कोरोनाशी लढा देण्याचा सर्वात मोठा उपाय स्वतःची आंतरिक शक्ती जागृत करणे आहे.

 स्वतःला सकारात्मक बनवा आणि नियमांचे पालन करण्याचा संकल्प प्रत्येक जळगावकर नागरिकांनी करावा, असे आवाहन महापौर सौ.जयश्री सुनील महाजन यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज