गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हेमा मालिनी संतापल्या, म्हणाल्या…

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याच्या वक्तव्याने भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता यावर थेट हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता थेट हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे. महिलांबाबत एका जबाबदार व्यक्तीने किंवा मंत्र्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही, सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.

हेमा मालिनी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी माझे गाल चांगले ठेवत असते म्हणून कदाचित बोलले असतील. हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. मला वाटतं त्यांना काही वाटलं असेल म्हणून बोलले. काही वर्षांपूर्वी लालूंनी असं विधान केलं होतं. त्यानंतर अनेकांनी तसंच बोलायला सुरुवात केली. पण अशा प्रकारची कमेंट करणं योग्य नाही. सामान्य लोकांनी बोलणं वेगळं. पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असं विधान करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असं विधान केलं जाऊ नये, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन, असंही ते म्हणाले होते.

संजय राऊतांकडून समर्थन
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्या या विधानाचं समर्थन केलं होतं. या प्रकारची तुलना आधीही झाली आहे. हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान आहे. या विधानाकडे नकारात्मकरित्या पाहू नका. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी याचं उदाहरण दिलं होतं. आम्ही सर्व हेमा मालिनींचा आदरच करतो, असं राऊत म्हणाले होते.

दे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -