fbpx

बिग ब्रेकिंग : चोपडा तालुक्यात कोसळले हेलिकॉप्टर ; काही जण ठार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. यात दोन जणांचा मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.

याबाबत असे की, चोपडा तालुक्‍यातील वर्डी शिवार असलेला भाव हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्‍या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्‍टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्‍पष्‍ट झालेली नाही. 

मात्र हेलिकॉप्‍टर असल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात दोन जणांचा मृत्‍यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे. आदिवासी परिसर असल्‍याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्‍टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्‍यात नेले. चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्‍थळी पोहचत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज