fbpx

अवजड वाहनाची लक्झरीला धडक; एक ठार, दहा जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । नॅशनल हायवे क्रमांक ६ चे काम सुरू आहे. त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. याच दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला अवजड वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कपिलनगर वस्ती जवळ रात्री घडली. 

सैय्यद अकबर सैय्यद उस्मान (50, मिठी खाडी, सुरत) असे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.  कपिल नगर वस्तीजवळ हवेच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे ते मुंबईहून येणार आहे ट्रॉली व सुरतला जाणारी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात मध्यरात्री झाला या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहे आहेत. यातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

mi advt

या अपघात प्रकरणी सैय्यद फारूख सैय्यद उस्मान (रा.मिठी खाडी, सुरत) यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक कुलदीपसिंग यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज