fbpx

जळगावकरांनो सावधान ; ‘या’ तारखेदरम्यान मुसळधार पाऊस

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । एकीकडे महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली असली तरी जळगाव जिल्ह्यात अद्यापही धो-धो पाऊस झालाच नाही. जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिली होती. नंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र, अद्यापही समाधान पाऊस झालेला नाहीय.

मात्र, ३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. गेल्या पाच वर्षांपासून जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वर्षानुवर्षे कमी कमी होत आहे. जिल्ह्यात महामार्गाच्या कामासाठी झालेली प्रचंड वृक्षतोड, शेती विकून त्यावर बांधकामासाठी होत असलेली वृक्षतोड, हेच मुख्य कारण असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगतात.

जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाल्याचे महसूल विभाग सांगते. रोज आकाशात ढग गर्दी करतात. मात्र, पाऊस पडत नाही. काही वेळातच आकाश स्वच्छ होते. याचा अर्थ पावसाच्या ढगांना गार हवा मिळत नाही. ती मिळण्यासाठी झाडांची गर्दी असणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अधून-मधून पाऊस पडत आहे. मात्र, मुसळधार पावसाची आतुरता जिल्हावासियांना अद्यापही आहे. सॅटेलाइटद्वारे आकाशातील पावसाची स्थिती पाहिली असता, येत्या ३१ जुलैपर्यंत पाऊस कधी कमी, कधी जास्त पडेल. मात्र, ३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

जुलैत सर्वांत कमी पाऊस

गेल्या पाच- सहा वर्षांचे पावसाचे जुलै महिन्यातील गणित पाहता जुलै महिन्यात कमी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

काही वर्षांची आकडेवारी अशी

२०१३ – ४११ मिलिमीटर

२०१४ – ३२८ मि.मी.

२०१५ – ६२  मि.मी.

२०१६ – ३४८  मि.मी.

२०१७ – २६०  मि.मी.

२०१८ – १४५  मि.मी.

२०१९ – १९०  मि.मी.

२०२० – ११०  मि.मी.

२०२१- ५७   मि.मी.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज