fbpx

चांगली बातमी : जळगाव जिल्हा यलो झोनमध्ये

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । गेल्या काही दिवसापासून ग्रीन झोनमध्ये असलेला जळगाव जिल्हा यलो झोनमध्ये आला असून शहरासह जिल्ह्यात पुढील काही दिवस दमदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तविला असून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येते.

देशात सध्या मान्सून सक्रिय झाला असून उत्तर महाराष्ट्रात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जोरदार पाऊस होत असला तरी उर्वरित परिसर मात्र कोरडाच आहे  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपलेले असतानाच हलक्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

mi advt

हवामान खात्याने अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नवीन अंदाज व्यक्त केला असून २२ ते २५ जुलै दरम्यान राज्यात दमदार पाऊस सांगितला आहे. भारताच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा हा हिरव्या झोनमधून पिवळ्या झोनमध्ये आला असल्याने पूर्वीपेक्षा चांगल्या पावसाची शक्यता आहे. वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पर्जन्यमान राहिल्यास बळीराजा आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

TH D220721

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज