जळगाव शहरात मुसळधार, नागरिकांची तारांबळ

बातमी शेअर करा

 जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । आज दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने जळगावकरांची दाणादाण उडाली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला. 

दरम्यान, गेल्या तीन चार दिवसापासून जळगाव जिल्हा येलो मध्ये आहे. परंतु हवा तसा पाऊस जिल्ह्यात अद्यापही झालेला नाही. रविवारी जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात रोज पावसाचे ढग दाटून येत आहे. 

परंतु पाऊस दरवेळी हुलकावणी  देत आहे. दरम्यान आज मंगळवारी जळगाव शहरात दुपारी ४ वाजेच्या वेळेस पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाचे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली.

जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

 

कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. तर जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -