जळगाव जिल्ह्यात पुन्हा २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सध्या आगामी दोन दिवसात जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. विशेष आज मंगळवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जून-जुलैच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुप्पटचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत सद्यस्थितीत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत ही सरासरी ११० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागरावर गेल्या अनेक दिवसांपासून चक्रीय क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन अनेक दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात ही जोरदार पाऊस बरसत आहे. २०१९ व २०२० प्रमाणेच यावर्षी देखील परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पूर्वहंगामी कापसाला मोठा फटका बसला आहे. तसेच सोयाबीन पिकाचा देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मागील महिन्यापर्यंत जिल्ह्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे जिल्ह्यावर जलसंकटचे सावट निर्माण झाले होते. परंतु मागील १५ ते २० दिवसापासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यात धरण क्षेत्रांमध्ये देखील पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर काही धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -