fbpx

धक्कादायक : शिवकॉलनीजवळ भरधाव डंपरने तरूणाला चिरडले; डंपर चालक फरार

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ भरधाव डंपरने एका तरुणाला चरडले आहे. यात डंपरचे चाक डोक्यावरून गेल्या तरूणाचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर डंपर चालकाने पळ काढला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मंगळवारी रात्री दहा वाजता महामार्गावरील शिव काॅलनी थांब्याजवळ हा अपघात घडला आहे. श्याम सुरेश पाटील (३७, निवृत्ती नगर) असे मयत तरूणाने नाव असून दुचाकीस्वार परेश रवींद्र पाटील (२९, संभाजी नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. परेश पाटील व श्याम पाटील दोघेही मित्र असून दूध फेडरेशनमध्ये कामाला होते.

mi advt

मंगळवारी रात्री परेश हा टॉवर चौकात असताना श्याम पाटील याने ‘मी जैनाबाद मध्ये आहे मला घ्यायला ये’ असे सांगून परेशला बोलावून घेतले. तेथून परेशच्या (क्रमांक एम.एच.१९ सी.टी.०५९१) या दुचाकीने श्याम याला निवृत्तीनगरात घरी सोडण्यासाठी जात असताना रात्री दहा वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याच्या अलीकडे मागून भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मागे बसलेला श्याम खाली फेकला गेला. त्यात श्यामच्या डोक्यावरुन टायर गेले तर परेश लांब फेकला गेला. या घटनेत श्यामचा जागीच मृत्यू झाला. तर परेशच्या उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे.

घटनेची माहिती मिळताच श्यामचा भाऊ अजय पाटील, राहुल पाटील, महेश पाटील, हितेश भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दोघांना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविले. तेथे श्यामला मृत घोषित करण्यात आले तर परेश याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याच्या उजव्या भुवईवर सात टाके पडले आहेत तर डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात फरार डंपरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज