जळगावकर सावधान : जळगावात ४ दिवसात येणार ‘हिट व्हेव’

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । जळगावात कोरोनासोबतच तापमानाचा देखील पार दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच आपल्या भागात येत्या ४ दिवसात ‘हिट व्हेव’ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

अधिक माहिती अशी कि, सध्या मध्य भारतात शुष्क हवा आहे. बंगालचा उपसागर किंवा अरबी महासागरातून आर्द्रतायुक्त हवा येत नसल्याने शुष्कता निर्माण होत आहे. त्यामुळे तापमान वाढण्याची अधिक शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात २३ ते २८ एप्रिल दरम्यान, हिट व्हेव सदृश्य स्थिती राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान तापमान ४३ ते ४७ अंशांवर तापमान जाऊ शकते.

मार्च ते २१ जून या कालावधीत सुर्याचा विषवृत्त ते कर्कवृत्तापर्यंत (२३.५ अक्षांश) प्रवास होताे. २१ जून ते २२ सप्टेंबर हाच प्रवास उलट्या दिशेने होतो. या कालावधीत सूर्यकिरणे लंबरुप पडल्याने तापमान वाढते. त्यामुळे उत्तर उष्णकटिबंधीय पट्ट्यात तीव्र उन्हाळा जाणवतो.

नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. असेही याकाळात लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर गर्दीचे प्रमाण कमीच राहणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज