fbpx

घरकुल घोटाळा : ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेवर २३ रोजी सुनावणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात महापालिकेतील भाजपचे पाच नगरसेवक दोषी ठरले असून त्यांना अपात्र करण्यासाठी गेल्या महिन्यात महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात दाखल दाव्यात 23 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त ठरावाच्या अनुषंगाने काय भूमिका घेतात? याकडे मनपातील नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

घरकुल घोटाळ्यात पाच नगरसेवक दोषी ठरले असून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या सर्व नगरसेवक जामिनावर असून पालिकेच्या कामकाजात सक्रीय आहेत. या पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयात अपात्रतेसाठी दावा दाखल केला आहे. 

दरम्यान, कोरोना काळात सुनावणी लांबणीवर पडली असून  येत्या २३ जून रोजी यावर कामकाज होणार आहे. या संदर्भात शिवसेनेने महासभेत पाचही नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे ठरावानुसार महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आता न्यायालयाला सर्व माहिती अवगत करतात की नाही? याकडे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज