जळगाव लाईव्ह न्यूज । आरोग्यदायी जळगाव । मानवी शरीरासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. मात्र काही नागरिक नियमित पाणी पित नाहीत. या नागरीकांना नियमित पाणी पिण्याची सवयच नसते. त्यामुळे त्यांना निर्जलीकरण, मूत्रमार्गाचे विकार आदी त्रास होऊ शकतो. यामुळे पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे.
दीर्घकाळ कुठल्याही ऋतूत दैनंदिन कमी पाणी पिण्याची सवय असेल तर त्याचे आरोग्यावर कायमस्वरूपी दुष्परिणाम होऊ शकतात. त्यात स्नायू आणि सांध्यांच्या विकारांचा प्रामुख्याने समावेश होतो. पाणी प्यायल्याने बद्धकोष्टतेसारखे त्रास टळतात. पाण्यामुळे शरीरातील उपद्रवी विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे मूत्रसंस्थेचे कार्य नीट चालते. स्नायू आणि सांध्यांमध्ये शुष्कता येत नाही व त्यांचेही कार्य व्यवस्थित चालते. पाण्याचे शरीरात योग्य प्रमाण असेल तर त्वचा तजेलदार राहते व शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासही मदत होते.
आहारतज्ज्ञांच्या मते मानवी शरीरातील प्रत्येक पेशीला तिचे कार्य व्यवस्थितपणे करण्यासाठी पाण्याची गरज भासते. पाणी पुरेशा प्रमाणात प्यायल्याने पचनसंस्था नीट कार्य करते व वाढत्या वयासह शरीरात पाणी साठवण्याची क्षमता क्षीण होते. तसेच तहानेची भावनाही होणे कमी होते. मधुमेह, स्मृतिभ्रंशामुळे किंवा काही औषधांमुळे पाण्याची शरीराला गरज असूनही तहान लागणे कमी होते. ज्येष्ठांना हालचालीच्या मर्यादा असल्याने ते स्वतःसाठी पाणी आणून पिऊ शकत नाहीत.
कामात गर्क असल्यास नियमित पाणी पिण्याचा विसर पडतो. तज्ज्ञ काही मुद्दे सुचवतात. ते लक्षात ठेवल्यास पाणी नियमित पिण्यास अडचण येणार नाही. ते असे. दररोज किती पाणी प्यायचे याचे स्वतःचे लक्ष्य निश्चित करा. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यस्त असाल तर दोन-तीन बाटल्या पाणी भरून कामाच्या ठिकाणी ठेवा. दर तासाने पाणी पिण्याची आठवण करून देण्याची व्यवस्था (रिमायंडर) मोबाइलमध्ये करावी. दिवसभर ठरावीक अंतराने पाणी प्यायचेच असा होते. ‘संकल्प करा. काही जणांना नुसते सर्व पाणी पिणे आवडत नसेल तर त्यात आपल्या आवडीनुसार लिंबू, स्ट्रॉबेरी आदींचा अंश टाकून त्या स्वादाचे पाणी प्या. काकडी, कलिंगडांसारखे पाण्याचे चांगले प्रमाण असणारी फळे खावीत, असा सल्लाही आहारतज्ज्ञ देतात.
सवयीत बदल करा…