‘मिसाईल मॅन’चा बहुमान जळगावला, अतुल राणे ब्रह्मोसचे प्रमुख

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील सावदा येथील रहिवासी अतुल राणे यांची ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनविणाऱ्या ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली असून, राणे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. काही वर्षांपासून ते ब्रह्मोस एरोस्पेसचे संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांना या संस्थेची सर्वोच्च जबाबदारी देण्यात आली आहे. ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड ही कंपनी ‘डीआरडीओ’च्या अंतर्गत येते.

ब्रह्मोस हा भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असून या संस्थेने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. डीआरडीओच्या क्षेपणास्त्र विकासामध्ये राणे यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान राहिले आहे. क्षेपणास्त्रातील ऑनबोर्ड कॉम्प्युटर्सचा विकास मिशन सॉफ्टवेअर तसेच संरक्षण यंत्रणेसाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण एव्हियन तंत्रज्ञानाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राशी नाळ

१) राणे हे मूळचे जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील साचदा येथील रहिवासी आहेत. त्यांनी चेन्नई येथून इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली.

२) त्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी गायडेड मिसाईल्स या विषयामध्ये पदव्युत्तर अभि यांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये रुजू झाले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -