अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवत केलं गर्भवती 

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । मामाच्या गावी शिक्षणासाठी आलेल्या 13 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती होण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित तरुणाच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पर जिल्ह्यातील 13 वर्षीय मुलगी चाळीसगाव तालुक्यात एका गावात आपल्या मामाकडे शिक्षणासाठी आली होती. नववीच्या वर्गात ती शिक्षण घेत असतानाच तिची ओळख तिच्या चुलत मामाच्या मुलाशी झाली. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पीडित बालिका मामाच्या घरात एकटी असताना संशयित तरुण तिच्या घरात घुसून व तिला तुझ्यावर माझे प्रेम आहे असे सांगितले. त्यानंतर संशयित आरोपीने पीडित बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण करून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी पीडित बालिका आपल्या आई-वडिलांकडे गेली असता काही महिन्यानंतर मासिक पाळी येत नसल्याने तिने आपल्या आईला सांगितले दरम्यान आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याचे सांगितले.

त्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन तिच्या कडून सर्व विचारणा केल्यानंतर संबंधित पीडित बालिकेने घडलेली सर्व आपबिती आईला सांगितली. त्यानंतर पीडित बालिका व आईने लोणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित बालिकेच्या फिर्यादीवरून तरुणाच्या विरोधात भादंवि कलम 376, 376(2), (एन), पोस्को कायदा 2012 चे कलम 4 अन्वये लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथून तो पोलिस अधीक्षकांच्या लेखी आदेशानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज