fbpx

गोलाणी बाहेरील हॉकर्सकडून महापौरांना साकडे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील गोलाणी मार्केट बाहेर हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर वारंवार मनपा कर्मचारी सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करीत काही हॉकर्सने गुरुवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, मनपा आयुक्तांनी निवेदन स्विकारण्यासाठी भेट नाकारल्याचेही त्यांनी सांगितले.

मनपा इमारतीजवळ गोलाणी मार्केटबाहेर काही हॉकर्स विक्रेते व्यवसाय करतात. नागरिकांना किंवा वाहतुकीला कोणताही त्रास नसताना मनपा प्रशासनाकडून त्यांच्यावर ४ वेळा कारवाई करण्यात आली. गुरुवारी दुपारी देखील उपायुक्त संतोष वाहुळे यांनी कारवाई करीत हातगाड्या जप्त केल्या. दरम्यान, हॉकर्सने यासंदर्भात मनपात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच उद्या मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. महापौरांनी रस्त्यावर उतरून हॉकर्सशी चर्चा करून त्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी महेश ठाकूर, कुणाल रामावत, निलेश प्रजापत, सुनील पिसाळ, अक्षय दुबे, रोहिदास बंजारी, संदीप मरसाले, पंकज कुंभार, उमेश रामावत, ओंकार दुबे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt