fbpx

पाणी टंचाईचे संकट : हतनूरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के कमी पाणीसाठा!

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या वर गेल्या असून दिवसेंदिवस नागरिक रणरणत्या उष्णतेने हैराण झाले आहेत. त्यातच जिल्ह्यातील तब्बल शंभर गावांना आणि शहरांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या हतनूर प्रकल्पात यंदा मागील वर्षीच्या तुलनेने सुमारे 16 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. हतनूर आणि तापी पट्ट्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.

हतनूर प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जलप्रकल्प आहे. जळगाव येथील एमआयडीसी, भुसावळ येथील रेल्वे, भुसावळ येथील आयुध निर्माणी,दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्र,वरणगाव येथील आयुध निर्माणी तसेच रावेर, सावदा, वरणगावसह परिसरातील लहान मोठ्या शंभर गावांना या प्रकल्पातून पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून या प्रकल्पात वाहून आलेल्या मोठ्या प्रमाणावरील गाळामुळे पाणीसाठा कमी तर गाळाचा साठा अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. या वर्षी मागील वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक आहे. शुक्रवारी (ता 9) सकाळी आठ वाजता प्रकल्पातील पाणीसाठ्याची परिस्थिती पुढीलप्रमाणे होती–

– पाणी पातळी– 210.985 मीटर्स,

– पाणीसाठा –234.25 दशलक्ष घनमीटर,

– जिवंत पाणीसाठा 101.25 दशलक्ष घनमीटर,

– पाणीसाठा 39.71 टक्के,

-मागील वर्षीचा 9 एप्रिल 2020 चा पाणीसाठा 56.18 टक्के.

हा पाणीसाठा परिसरातील सर्वच गावांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 जूनपर्यंत काटकसरीने पुरवावे लागणार आहे. असंख्य ठिकाणी सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे तो तीन अथवा चार दिवसांआड करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज