fbpx

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले ; तापीला पूर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२१ । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे आज बुधवारी दुपारी १ वाजेला धरणाचे संपूर्ण ४१ दरवाजे पूण समतेने उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे.

मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. हतनूर धरणाच्या मध्यप्रदेश व विदर्भातील  पाणलोट क्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे.

आज बुधवारी दुपारी १ वाजेला धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे दर सेकंदाला धरणातून ८२ हजार १७८ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापीला पूर आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज