हतनूरचे चार दरवाजे उघडले ; तापी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या दोन तीन दिवसापासून चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज 2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाण्याचा येवा वाढत असून धरणांमधून तापी नदीपात्रात पाणी सोडले आहे.

आज सकाळी ९ वाजेल हतनूर धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून १५ हजार ५३९ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तरी तापी नदी काठावरील गावातील सर्व नागरिकांनी व सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे.

नदीच्या काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगांव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -