fbpx

हतनूर धरणाचे ४ दरवाजे उघडले ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज शनिवारी सकाळी ६ वाजता प्रकल्पाचे ४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून ५ हजार ५३४ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी आतापर्यत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. परंतु शेजारील मध्यप्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 

mi advt

प्रकल्प पाणीपातळी २०९.१४० मिटर असून तापी पूर्णा नदीपात्रांत पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे ४ मिटरने उघडण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज