fbpx

भुसावळात हार्डवेअरचे दुकान फोडून ८ ते १० लाखाचा ऐवज लांबविला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । भुसावळात अज्ञात चोरट्यांनी हार्डवेअरचे दुकान फोडून १० लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आलीय. सोबतच लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर देखील चोरून नेला. याबाबत भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत असे की, भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील चुडी मार्केटमधील जितेंद्र बळीराम अहुजा रा. भुसावळ यांचे अशोक हार्डवेअरचे नावाच्या दुकानात रात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांचे जळगाव शहरात देखील दुकाने आहेत. दरम्यान, आज्ञात चोरट्यांनी अशोक हार्डवेअरच्या पाठीमागे असलेल्या लहान लाकडी खिडकीतून प्रवेश करत सुमार विविध प्रकारचे साहित्य व वस्तू असा एकुण ८ ते १० लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सोबत अहुजा यांनी लावलेले १० सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर देखील चोरून नेला. आज सकाळी दुकानातील काम दुकानावर सामान घेण्यासाठी आले असता दुकानात पाहिले असता दुकानातील सर्व सामानांची फेकाफेक केलेले दिसून आले.

दुकानात चोरी झाल्याचे कळता मालक जितेंद्र अहुजा हे दुकानात दाखल झाले. भुसावळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, महापालिकेच्या बंद मार्केटमध्ये मध्यरात्री काही टवाळखोर तरूण अफू व गांजा पिऊन धुमाकुळ घालत असतात. त्यांनीच ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज