fbpx

ज्येष्ठ नागरीक म्हणजे माहिती, ज्ञान, ऊर्जा यांचा संगमच ; माजी आ. महेंद्रसिंह पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । ज्येष्ठ नागरीक म्हणजे माहिती, ज्ञान, ऊर्जा, मनोरंजन, शिस्तीचा संगमच असतो, त्यांचा कधीही कोणाला त्रास नसतो. त्यांचा नेहमी सन्मान व्हावा असे प्रतिपादन तालूक्याचे माजी आमदार महेंद्रसिंह बापू पाटील यांनी केले तर एरंडोलचा ज्येष्ठ नागरीक संघ जिल्ह्यात आदर्श असून प्रशस्त हॉल, आल्हाददायक परिसर आणि उत्साही, आनंदी ज्येष्ठ मंडळी असल्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खास ज्येष्ठांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्रासाठी विशेष प्रयत्न करून एरंडोलला सुर्योदयसाठी आणणार अशी ग्वाही भाजपचे नेते अ‍ॅड. किशोरभाऊ काळकर यांनी दिली.

सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहाच्या नुतनीकरण कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी कौतूक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. महेंद्रसिंह बापू पाटील होते तर दीपप्रज्वलन महाराष्ट्र प्रदेश जनजाती क्षेत्रप्रमुख भाजपाचे अ‍ॅड. किशोरभाऊ काळकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन एरंडोल नपाच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका छायाताई दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष रमेशभाऊ परदेशी, मुख्याधिकारी विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष देविदासभाऊ महाजन, सामाजिक कार्यक़र्ते आनंदभाऊ दाभाडे, नगरसेवक नरेंद्र ठाकूर, नितीन महाजन, नगरसेविका वर्षाताई शिंदे, अ‍ॅड. ओम त्रिवेदी, उद्योजक पंकजभाऊ काबरा, हॉटेल कृष्णाचे संचालक कृष्णा धनगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक़्रमाची सुरूवात सानेगुरूजींच्या खरा तो एकचि धर्म प्रार्थना संचालक नामदेवराव पाटील यांनी म्हणून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फलक अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरीक संघटनेतर्फे सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी निवृत्त आर. एन. पाटील (राघो नामदेव पाटील, वय 84), विश्वनाथ गोटू पाटील, रमेश जोशी, सत्यनारायण तोतले सर, पी. जी. चौधरी यांचा वाढदिवसनिमित्त सत्कार करण्यात आला. किशोरभाऊ काळकर, आर. एन. पाटील, कृष्णा धनगर, रमेश जोशी यांनी देणगी दिली. सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी यांनी प्रास्ताविकात संघाची वाटचाल विविध उपक्रमांबाबत माहिती देवून सभागृाचे बांधकामासह नुतनीकरणासाठी आर्थिक़ मदत देणार्‍या दानशूरांना धन्यवाद दिले.

सदरप्रसंगी नपा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका छायाताई दाभाडेे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शहरातील गरीब, गरजू अथवा संस्थेसाठी आम्ही दोघे (पती आनंद दाभाडे) मदतीसाठी नेहमी धावून जातो. यावेळी मनस्वी आनंद आणि समाधान लाभते. सुर्योदय सभागृहासाठी आम्ही केलेली मदत अल्प असली तरी यापुढे देखील सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्ष रमेशभाऊ परदेशींनी देखील सुर्योदय संघाच्या कामाकाजाबाबत समाधान व्यक्त करून ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. तसेच माजी नगराध्यक्ष देविदासभाऊ महाजन यांनी सांगितले की, सर्व ज्येष्ठ मंडळी उत्साही आणि आनंदीत असल्यानेच काम उत्तम सुरू आहे. अनेक चांगलेग उपक्रम राबवित असल्याने कौतूक देखील केले.

सदरप्रसंगी एरंडोल नपाचे नव्यानेच आलेले मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सुर्योदय संघाची कार्यपध्दती, निटनेटकेपणा, संचालक, सदस्य यांचा उत्साह पाहून समाधान व्यक्त केले. आदर्श संघ म्हणून गौरव केला. सूत्रसंचलन सचिव विनायक कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संचालक तथा कवी निंबा बडगुजर यांनी केले. श्रीसंत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक़्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी संचालक वसंतराव पाटील, जाधवराव जगताप, सुपडू शिंपी, गणेश पाटील, भगवान महाजन, जगन महाजन, सुर्यकांत ठाकूर, भास्कर बडगुजर यांचेसह सदस्य प्रा. शिवाजीराव अहिरराव, नरेंद्र शिंदे सर, सखाराम ठाकूर, मधुकर तिवारी, सुरेश देशमुख, प्रकाश तोतला, सुरेश जाखिटे, नपा कार्यालयप्रमुख हितेश जोगी, बाबुलाल मिस्तरी, गणसिंग पाटील, पंडीत महाजन, भिमराव पाटील, रामलाल महाजन, सुभाष दर्शे, लक्ष्मीकांत पाटील, हरी नानजी पाटील, अरूणा राघो पाटील, सरलाबाई पाटील आदींची उपस्थिती होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज