सावदा येथील हाजी शेख हारुन यांना डॉक्टरेट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । कॉमनवेल्थ ओकेशनल युनिव्हर्सिटी किंग्डम ऑफ टोंगा दिल्ली यांचेतर्फे शैक्षणिक व सामाजीक कार्यकरणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो यंदा संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या सर्व्हे मध्ये सावदा येथील शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणारे शेख हारून शेख इक्‍बाल यांची निवड करण्यात आली होती. त्यांना दि.18 रोजी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टरेट (पीएचडी) बहाल करण्यात आली.

येथील केळी साठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या सावदा येथील शेख हारून शेख इक्‍बाल हे व्यवसायानिमित्त त्यात अग्रेसर आहेत. त्यांची सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती जनसामान्य सारखे असल्यावर त्यांनी आपल्याला गोरगरीब जनतेचे व समाजाचे काहीतरी देणे लागत असून या परिस्थितीतून एक उंच भरभराटीची गरुड झेप घेऊन सामाजिक स्तरावर त्यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता हाजी इक्बाल हुसेन मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा अनेक सामाजिक कार्य विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.

फाऊंडेशनचे सचिव व डायमंड इंग्लिश मीडियम शाळेचे चेअरमन हाजी हारून शेख ह्यांना त्यांच्या ह्या कार्याचीच दखल घेऊन डॉक्टरेट (पीएचडी) पदवी दि.18 रोजी झालेल्या दिल्ली येथील होटल रेडिसन उद्योग विहार दिल्ली येथे
डॉ.रिपू रंजन सिन्हा, प्रो.व्हाईस कन्सिलर (एशिया) कॉमनवेल्थ व्हेकेशनल युनिर्वसिटी किंग्डम आँफ टोंगा बहाल करण्यात आली. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहराचे नाव त्यांनी दिल्लीत पुन्हा एकदा शैक्षणिक व सामाजीक कार्याव्दारे वेगळ्या उंचीवर पोहचवले आहे. त्यांना मिळालेल्या या सन्मानबद्दल त्यांचे सावदा व परीसरातील विविध क्षेत्रातून अभिनंदन होत असून लवकरच सावदा येथे एक अभिनंदन सोहळ्याचे आयोजन देखील त्यांचे हितचिंतक करणार असल्याचे समजते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -