⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रायसोनी महाविद्यालयात हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन

रायसोनी महाविद्यालयात हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन कल्पना व निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी रायसोनी महाविद्यालया’तर्फे हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, हिताची कंपनीचे उपव्यव्स्थापक प्रकाश पाटील, आर. पी. कन्सट्रक्शनचे संचालक पंकज साळी, इलेक्ट्रो सोफ्ट सिस्टिम्स प्रा.ली. व्यवस्थापकीय संचालक निलेश वाघ व राजेश ठाकरे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हटले कि, भारताला संशोधन क्षेत्रात प्रगती करायची असल्यास विविध प्रश्नां ची सोडवणूक करू शकणाऱ्यांचा मोठा गट निर्माण करणे गरजेचे आहे. एचआरडी मंत्रालय, एआयसीटीई आणि यूजीसी यांना ही गोष्ट समजली व त्यामुळेच या संस्था अनेक उपक्रमांच्या माध्यमांतून इनोव्हेशन, निर्णायक विचारपद्धती व माहितीवर आधारित कौशल्य विकसित करण्यावर भर देत आहेत. यातील ‘एमएचआरडी’चा महत्त्वाचा उपक्रम हॅकेथॉन असून, त्याद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये इनोव्हेशन व प्रश्नांलची सोडवणूक करण्याची संस्कृती रुजविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने आज रायसोनी महाविद्यालयात हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून आनंद वाटत आहे. तसेच यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभियंते,विद्यार्थी, ग्राफिक डिझायनर्स, इंटरफेस डिझायनर्स व तज्ज्ञ एकत्र विचार करतात. त्यातून दिलेल्या प्रश्नाआची सोडवणूक करू शकणारे एक कार्यशील उत्पादन दिलेल्या वेळात विकसित करतात. तसेच ‘एमएचआरडी’ व ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ची संकल्पना अत्यंत साधी आहे. एका बाजूला आमच्या देशात लाखो प्रश्न आहेत, तर दुसरीकडे प्रश्नां ची सोडवणूक करणे अपेक्षित असलेले लाखो विद्यार्थीही आहेत. आपण हे सर्व प्रश्नर आणि त्यांना सोडविणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणू शकतो का? हे साध्य झाल्यास आपण संशोधनाद्वारे चांगली उत्पादने निर्माण करू शकू व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारा आणि बाजारात टिकून राहण्यास उपयुक्त ठरणारा प्रचंड मोठा तांत्रिक अनुभवही देऊ शकू. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

‘स्मार्ट इंडिया इंटरनल’ ही या हॅकॅथॉन स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना होती. स्पर्धेसाठी कोणत्याही वयोगटातील जास्तीत जास्त चार सदस्यांच्या संघांना परवानगी देण्यात आली होती. यामध्ये ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच स्पर्धेतील १५ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून ते राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम फेरीत आपली चमक दाखविणार आहे. सदर स्पर्धेसाठी प्रा. अविनाश पांचाळ यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर प्रा. अनिल पोशेट्टी, प्रा. बिंदेश नुनीया, प्रा. मनोज चोखंडे, प्रा. प्रेम आर्या, प्रा. मयुरी गचके, प्रा. कल्याणी पाठक, प्रा. प्रिया टेकवानी यांनी सहकार्य केले तसेच स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह