fbpx

पारोळ्यात साडेतीन लाखाचा गुटखा जप्त

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । पारोळ्यात गुटखा, तंबाखू, सुगंधी गुटखा असा एकूण तीन लाख ६६ हजार रुपयाचा गुटखा तर एक लाख पन्नास हजाराचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. पारोळ्यात ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पारोळा-धरणगाव रस्त्यावरील पिंपरखेड मारुती मंदिराजवळ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात धरणगावकडून येणारा टेम्पो (क्र. एमएच १९- बी. एम. ४९५७) वरील चालक सतीश रमेश पाटील (३८, रा. राममंदिरासमोर धरणगाव) याच्याकडील वाहनाची तपासणी करण्यात आली. यात गुटखा, तंबाखू, सुगंधी गुटखा असा एकूण तीन लाख ६६ हजार रुपयाचा गुटखा तर एक लाख पन्नास हजाराचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

दरम्यानं, हा गुटखा भटू मराठे धरणगाव याने पारोळा येथील कैलास चौधरी याच्याकडे पोहोच करण्यास सांगितले असल्याचे टेम्पो चालक सतीश पाटील याने पोलिसांना सांगितले. याबाबत पोलीस नाईक प्रवीण रमेश पारधी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून सतीश रमेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज