fbpx

सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं सडेतोड उत्तर ; म्हणाले…

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ ।  “शिवसेना प्रमुख हे शिवसेनेचे गँगप्रमुखच आहेत. त्या गँगप्रमुखाच्या बापाने काय केलंय हे आख्ख्या महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँगप्रमुखाच्या नादाला लागू नये, अशा शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्त्युतर दिले. 

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली होती. “शिवसेना वर्धापन दिनाचं उद्धव ठाकरेंचं भाषण सत्ताप्रमुखाचं नसून गँग प्रमुखाचं भाषण आहे. २ दिवसांआधीच यांनी आपण गुंड आहोत असं सांगितलं. आता काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा केली जात आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले होते. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. त्या गँग प्रमुखाच्या बापाने काय केलंय, हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले आहे, अशा शब्दांत पाटील यांनी इशारा दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज