मी नारायण राणेंनाही पुरून उरलोय, माझ्या नादी लागू नका ; ना. पाटलांचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि खा.उन्मेष पाटील यांच्यात सध्या चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. शेतकरी मोर्च्याच्या टीकाटिपण्णीवरून हा वाद सुरु झाला आहे. खा.उन्मेष पाटलांनी मोर्चात केलेल्या टीकेचा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. ना.पाटील यांनी नारायण राणे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनाही लक्ष केले आहे. पाचोरा येथे आ.किशोर पाटील यांच्या वाढदिवस कार्यक्रमातील तो व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे.

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचे नाव नसल्याचा आरोप भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी केला होता. या आरोपाला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. उन्मेष पाटील एक लक्षात ठेवा मी नारायण राणेंनाही पुरून उरलो आहे. माझ्या नादी लागू नका, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

यावेळी ते म्हणाले की, भाजप खासदाराकडून आमच्यावर टीका केली जात आहे. आम्ही दोन वर्षात काय केले असे भाजप खासदार उन्मेष पाटील विचारतात परंतु मी त्यांना विचारतो खासदार झाल्यावर खासदार निधीतून एक तरी स्वच्छतागृह बांधले काय? आमदार किशोर पाटील तर तयारच नव्हते पण आपण त्यांना तयार केले आहे.आपण नारायण राणे यांच्या सारख्यांना पुरून उरलो आहोत त्यामुळे उन्मेष पाटील हे तर माझ्या पुढे कुठेच लागत नाही.

राज्य सरकारच्या नुकसान भरपाईच्या मदतीच्या यादीमध्ये जळगाव जिल्ह्याचे नाव नसल्याने भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. टीका करताना त्यांनी म्हंटले होते की, गुलाबभाऊ झोपा काढता काय? त्यांना लाज वाटली पाहिजे. गुलाबराव पाटील हे पालक आहेत का बालक आहेत, असा सवाल पाटील यांनी केला होता. त्यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज