fbpx

पालकमंत्र्यांकडून ठाकरे सरकारच्या नियमांना केराची टोपली!

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नियमावली लागू करण्यात आली असली तरी राजकारण्यांकडून मात्र त्याची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे. शनिवारी मनपात झालेल्या आढावा बैठकीत देखील त्याचा प्रत्यय आला. रविवारी शिवसंपर्क अभियानच्या निमित्ताने अजिंठा विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संपूर्ण हॉल गर्दीने खच्चून भरला होता.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सर्वसामान्य कष्टकरी जनतेला व व्यापाऱ्यांना रोज चारच्या आत घरात जावे लागत आहे. मात्र मस्तवालपणे सत्ताधारी शिवसेनाच या सगळ्या नियमांना केराची टोपली दाखवत आढावा बैठक घेत असल्याचे चित्र आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात दिसून आले. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील स्वतः या बैठकीला उपस्थित होते. इतकंच नव्हे तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, विष्णू भंगाळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी देखील बैठकीला होते.

शनिवारी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एकही कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचे पालन झाले नसल्याचे पहावयास मिळाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज