fbpx

लॉकडाऊनमुळे गुढीपाडव्याचा उत्साह झाला मंद

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । हिंदू बांधवांचा पवित्र सण गुढीपाडवा. चैत्र महिन्याचा पहिला म्हणजेच मराठी नववर्षाच्या सुरुवातीला घरोघरी गुढी उभारून तिचे पूजन केले जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला नवीन वाहन, सोने, वस्तू खरेदी केली जाते मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे सावट आणि सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने नागरिकांनी गुढीपाडवा घरीच साजरा केला. आर्थिक अडचणी लक्षात घेता नागरिकांनी घरीच गोडधोड करून नैवेद्य दाखवत आपला सण गोड केला.

मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सकाळी संघाच्या पारंपारीक वेषभुषेत पथसंचलन केले जाते.पथसंचलन पारंपारीक वाद्य वाजवित होत असल्याने शिस्तीचे धडे मिळण्यासोबत सर्वांच्याच आकर्षणचा तो विषय ठरत होता. शस्त्रपूजनही केले जात असे. यंदा कोरोना सावटामुळे हे सर्व बंद होते. हिंदू बांधवांनी सकाळीच नवीन कपडे परिधान करून कुटूंबियांसोबत गुढी उभारली. यादिवशी कडूलिंबाच्या पानांचा रस करून दिला जातो.यामुळे आरोग्यवृ्ध्दी होते. त्यानंतर नातेवाईक, मित्र, मैत्रीणींना मोबाईलवरून किंवा फोन करून शुभेच्छा देण्यात आला.

या मुहूर्तावर सोने खरेदी मोठया प्रमाणात होते. जळगावला अस्सल सोन्याची बाजारपेठ म्हटली जाते. यामुळे राज्यभरातून नागरिक येथील सोने बाजारात खरेदीसाठी यादिवशी झुंबड करतात. यंदा अशी झुंबड पहावयास मिळाली नाही. यामुळे सोने बाजारातील आजची मोठी उलाढाल ठप्प होती असे सराफ व्यावसायीकांनी सांगितले.

गुढीपाडव्याला हजारो नवीन वाहनांची विक्री होते. त्यासाठी नागरिक आगाउ बुकींगही करतात. अनेकांनी बुकींगही केली होती. मात्र कोरोनाचे निर्बंध असल्यान वाहन विक्रेत्यांना वाहनांची डिलेव्हरी ग्राहकांना करता आली नाही. अनेक नागरिकांचे वाहन खरेदी स्वप्न र्पूर्ततेसाठी काही काळ आता द्यावा लागणार आहे. हजारो वाहनांच्या विक्रीतून कोट्यावधीची उलाढाल आज ठप्प झाली होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज