fbpx

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज धरणगावात शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याहस्ते काटा पूजन करून आजपासून धान्य खरेदी सुरू करण्यात आली.

खरेदी केंद्राचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब साहेबराव पाटील फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन एन. डी.  पाटील हे होते. पालकमंत्र्यांनी काटा पूजन करून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना पेढा भरवून त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदीस प्रारंभ करण्यात आला. याच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण१७ खरेदी केंद्र असून ज्वारीसाठी २५ हजार ५०० क्विंटल, मकासाठी ६० हजार क्विंटल तर गहुसाठी २ हजार २४० क्विंटल खरेदीचे उद्दिष्टे मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्टे कमी पडत असल्याने वाढीव उद्दीष्ट साठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली.  शेतकर्‍यांनी धान्य खरेदी केंद्रांच्या सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

दरम्यान, सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असतांना शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर, बियाणे खरेदी करतांना पावत्या आवर्जून घेण्याचे व पावसाचा अंदाज पाहूनच कोरडवाहू शेतकर्‍यांनी आवाहन केले. बळीराजाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,  पं. स. सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती प्रेमराज पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, संचालक डॉ. विलास चव्हाण,  रवींद्र पाटील,  बाळकृष्ण बोरसे , शालीग्राम पाटील , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , जे.पी. पाटील, सचिव नवनाथ तायडे, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे,  तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार एल. एन. सातपुते , प्रथमेश मोहोळ, सहायक निबंधक जे. के. बारी, न.पा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, शहर प्रमुख राजेद्र महाजन, शिवसैनिक वाल्मिक पाटील , मोहन महाजन, विनोद रोकडे, धानोरा सरपंच भगवान महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविकात अण्णासाहेब साहेबराव पाटील फ्रुट असेल सोसायटीचे चेअरमन प्रा.एन. डी. पाटील यांनी भरडधान्य खरेदीबाबत उद्दिष्ट वाढीची मागणी केली .सूत्रसंचालन व आभार रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज