fbpx

‘लोकसंघर्ष मोर्चा’ तर्फे लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । ‘ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर उभी आहे’ हे जगाला ठणकावून सांगणारे लोकसाहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जात-धर्म-वर्ग संघर्षातील थोर प्रवर्तक होते. भारताचा मॅक्सिम गार्की अशी त्यांची ख्याती होती. कष्टकऱ्यांचे दुःख त्यांनी आपल्या साहित्यातून, पोवाड्यांमधून व्यक्त केले. आपल्या लोकसाहित्यातून स्वाभिमानाचे भान त्यांनी कष्टकरी समाजाला दिले, असे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी आज केले. लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिभाताई शिंदे यांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊंची जीवन प्रेरणा उपस्थितांपर्यंत पोचवली. त्यांच्या अफाट प्रतिभा आणि कर्तृत्वाचे स्मरण केले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन भाऊ धांडे, भरत कर्डिले, कैलास मोरे, निता पाटील, रुपाली मोरे, सुभाष पवार, राजेंद्र सोनवणे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज