fbpx

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी अभिवादन केले आहे.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक तुकाराम हुळवले, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार रविंद्र मोरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज