fbpx

दसरा धमाका ! राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे पुन्हा गजबजणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ आता राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरू करण्यात येतील. चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. २२ ऑक्टोबरला राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होतील. जवळपास दीड वर्षापासून चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी महिन्याभराचा वेळ लागेल.

mi advt

यात मास्क लावणं, सॅनिटायझेशनसह अनेक गोष्टींचा समावेश असेल. दरम्यान २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या चित्रपटगृहात किती टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येईल याची अजून स्पष्टता केलेली नाही. तरीही सुरुवातीच्या दिवसांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेसह चित्रपटगृह सुरू करण्यात येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज