पुस्तकांना लागलेली कीड महापुरुष दूर करतात : डॉ.मिलिंद बागुल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका विशेषांक प्रकाशन समारंभ अँड.एस.ए.बाहेती महाविद्यालय जळगाव येथे पार पडला. यावेळी डॉ.मिलींद बागुल हे प्रमुख वक्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अनिल लोहार हे होते.

दरम्यान, डॉ.मिलींद बागुल यांनी श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य आपल्या संविधानात आहे पण सध्या स्वैराचार पहायला मिळते आणि सोबतच कायद्याचा आदर करण्याचा आग्रह केला. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका ही समाजाची किड दुरुस्त करण्याचे काम करीत आहे असेही सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी श्रद्धा,अंधश्रद्धा व विश्वास समजून घेण्यासाठी कार्यकारणभाव व वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासले पाहिजे आणि हे सर्व विवेक जागृत ठेवून शक्य आहे असे प्रतिपादन केले.

अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिरीष चौधरी व कल्पना चौधरी यांनी केले. तर सूत्रसंचालन सुरेश थोरात यांनी केले. तसेच प्रा.दिलिप भारंबे यांनी अंधश्रद्धेचा अंधार हटवण्यासाठी अंनिप महत्वाची भूमिका बजावत आहे.

प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी केले.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका विशेषांकासाठी घेतलेल्या हितचिंतकांचे आभार मानून अंक यशस्वीतेसाठी घेतलेल्या परिश्रमाविषयी आढावा दिला. समारोप व आभार जळगाव शहर शाखेचे कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -