कला, विज्ञान शाखेच्या मुलांना ‘जीआयएस’मध्ये करीयरची मोठी संधी : डॉ.साईनाथ आहेर

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ‘जीआयएस’च्या क्षेत्रात करीयरची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे डॉ.साईनाथ आहेर यांनी केले.

मू. जे. महाविद्यालयातील भूशास्त्र प्रशाला व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक भौगोलिक माहिती प्रणाली दिनानिमित्त ‘भूगोल विषयातील जी आय एस क्षेत्रात करियरच्या वाटा’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा.डॉ. स.ना.भारंबे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. पुढे बोलतांना डॉ.साईनाथ आहेर यांनी भूगोल विषयातील जी.आय.एस.म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीने घडवलेल्या क्रांती विषयी तसेच माहित शेत्रातील कंपन्या व सरकारी विभाग यात भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना कश्या पद्धतीने संशोधन व करियर करता येवू शकते याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चेतन महाजन यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सागर डोंगरे यांनी केले. आभार डॉ.गुलाब तडवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सहदेव जाधव, प्रा.ए.के. साळुंखे, प्रा.भरत महाजन, गणेश सोनार आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज