विद्यापीठात सुरु होणार ‘ग्राफीक्स डिझाईन एक्सपर्ट’ कोर्स

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई येथील डवेलर्न टेक्नॉलॉजी डाटा सायन्स इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत ग्राफीक्स डिझाईन एक्सपर्ट या विषयाचा कोर्स सुरू करण्यात येणार आहे.

आधुनिक व प्रगत शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात जाहिरात क्षेत्राचे महत्व वाढले आहे. मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमांवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहीरातीचा वापर होतो. उत्पादनांचे व सुविधांचे अधिक कल्पकपणे, नेमकेपणाने सादरीकरण होण्यासाठी ग्राफीक्स डिझाईनला फार महत्व आहे. फोटोशॅप, कोरोल ड्रा, इलस्टे्रटर यासारख्या संगणकीय प्रणालीद्वारे मुंबई येथील ग्राफीक्स इंडस्ट्रीतील अनुभवी शिक्षकांकडून शिकवला जाणार आहे. विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाद्वारे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण व वनवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात ७५ टक्के सुट देणार असल्याचे आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.मनिष जोशी यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेस्थळाला तसेच ०२५७-२२५७४१५\४१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज