fbpx

आजी-आजोबांसोबत नातवंडांनी साजरा केला जागतिक शिक्षक दिन

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात आजी-आजोबांनी आपल्या नातवंडासोबत जागतिक शिक्षक दिन एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून साजरा केला.

जागतिक शिक्षक दिन तसेच शरदोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आजी-आजोबा मोठ्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले. गीत गायन, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, बादलीमध्ये चेंडू टाकणे, तांदूळांमधून शेंगदाणे आणि नाणी वेगळे करणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी ‘ये तो सच है कि भगवान है…’ या गीताने केली तर सांगता सर्व आजी-आजोबा यांनी गरबा नृत्य करून केली. याप्रसंगी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी व मुख्याध्यापिका रेखा पाटील उपस्थित होत्या. आपल्या नातवंडासोबत सोबत अशा स्पर्धेत सहभागी होण्याचा एक वेगळाच आनंद आजी-आजोबांनी यावेळी अनुभवला.

स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ओम सोनार या विद्यार्थ्याचे आजी-आजोबा छगन सोनार व मीना सोनार , द्वितीय क्रमांक पलक कासार व त्याचे आजी आजोबा यांनी तर तृतीय क्रमांक शर्वरी खैरनार या विद्यार्थिनीचे आजी आजोबा अरुण खैरनार व सुलोचना खैरनार यांनी पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले. परीक्षण धनश्री फालक व सरला पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी सुर्यकांत पाटील, कल्पना तायडे, दिपाली चौधरी, सुधीर वाणी, सुनील नारखेडे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज