सर्व ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी ग्रामसभा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्याचा तसेच १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत १६ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन होणार आहे. असे जिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महाजन यांनी सांगितले  आहे.

 

….तर करता येईल, नावनोंदणी

विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या मतदार यादीचे ग्रामसभेत वाचन होेणार आहे. ज्यांचे वय १ जानेवारी रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे. त्यांची नवीन मतदार म्हणून तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नावनोंदणी करता येईल. यादीमधील नोंदीबाबत हरकती असल्यास नाव नोंदीमध्ये दुरुस्ती असल्यास अर्ज भरुन घेण्यात येईल. गावातील मृत मतदार, कायम स्थलांतरीत मतदार, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी करता येईल. दिव्यांग व्यक्ती मतदार नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकित करण्यात येतील. विशेष ग्रामसभेत सहभागी होऊन नाव नोंदणी, नावाची दुरुस्ती, आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महाजन यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज